Posts

Showing posts from July, 2019

ती -माझं पहिल प्रेम (भाग २४वा )

Image
ती -माझं पहिलं प्रेम (भाग २४वा ) चार दिवस झाले होते,शुक्रवार कधी आला हे त्यांना समजलेच नाही नेहमी प्रमाणे हर्ष आणि त्याचे मित्र शाळेत रमत गमत मस्ती मज्जा करत आप -आपल्या साइकल वर स्वार होऊन निघाले . मुख्य रस्त्यापासून शाळेत जाण्यासाठी दोन रस्ते होते एक पक्का रस्ता होता तर एक शेताच्या बांधावरुन शॉर्टकट होता. शाळेच्या रस्त्याजवळ आले,शिवन्या त्या शेताच्या बांधावार काहीतरी करताना आवि ला दिसली . आवि :ये हर्षा साईकल थांबव ती बग शिवन्या काय करते तिथे ? हर्ष :(सर्वजन साइकल तिथेच थांबवतात ) अरे हा ! एका तुम्ही जा पुढ़े  मी बगतो तिला . सम्या :  आता काय आइटम भेटली आता मित्राना हो पुढे . हर्ष :अरे नाही रे भाव आहेस तु आपला जा पुढे आवि साईकल घेऊन जा मी तिच्या सोबत चालत येतो . आवि :ओके भावा बेस्ट ऑफ लक .ये लवकर  हर्ष :हो आलोच . (हर्ष तिच्या जवळ जातो ) हर्ष :हाय गुड मॉर्निंग !!!!!!!! शिवन्या : गुड मॉर्निंग तु आहेस का पन तु आज चालत आलास  हर्ष :अरे नाही नाहीं तुला पहिलं म्हणून हिथे अलो तु काय करतेस ते बघायला माझे मित्र पुढे गेले माझी साइकल घेऊन...

ती -माझं पहिलं प्रेम (भाग २३वा )

Image
ती माझं पहिलं प्रेम  ( ४वाजुन गेले होते शाळा सुटली होती, थोड़ा थोड़ा पाऊस होता सर्वानी रेनकोट घातले होते आणि सर्वजण त्या पाऊसातुन घरी निघाले . पाऊस सुरु होऊन १५दिवस जास्त झाले होते .आणि कोकणात राहणाऱ्या माणसाला निसर्ग हा आपला जिवलग मित्र वाटतो .हिरवाई ही कोकणाची ओळख तर शिवाय निसर्गाने या मातीला दिलेली देणगी . हिरवा निसर्ग पाने, फुले, नदया डोंगर हे सर कही कोणालाही भुलउन  टाकतो .पहिल्या पाऊसात मन मोहावून टाकनारा मातीचा सुगंध.प्रत्येकाला हवाहवासा वाटतो . आणि असं चित्र समोर दिसलं कि,संजय माने सरांची कविता आठवते हिरवा निसर्ग  भिजली माती पिकले मोती  रानपाखारे खुशित गाती  मंद उसासे टाकी धरती  दाटून येता नभं हे वरती  दुथडी भरून नदया वाहती  दोन तिरांना कवेत घेती  मुले, फुले आन मने नाचती  उत्साहाला येई भरती  हिरव्या रानी पाचू फूलती  कोकिलस्वार हे मनी गुंजती  आठवता मायेची नाती  नववधुचे डोळे भिजती . सम्या : यार हरश्या  दोन दिवसात खूपच जवळची मैत्री केलिस रोज एका छत्रीत जाता.मज्जा आहे तुझी आम्ही तिथे रोज प्रयत्न करतोय...

ती - माझं पहिलं प्रेम (भाग २२वा )

Image
ती -माझं पहिलं प्रेम (भाग २२वा ) (वर्गात आल्यावर सगळेजण आप-आपसात चर्चा करत होते प्रत्येकजण तर्क लावत होता काल केलेली मारामारी चा विषय वर्गात पोहचला होता काही विद्यार्थ्यांना त्याची कल्पना होती तर काही जन त्यावेळी तिथे उपस्थित होते . बाईंनि सुद्धा त्यांना बजाउन सांगितले असेल धंदे हिथे चलणार नाहीत नाहीतर हाकलून देतील शाळेतून ही झेड पि ची शाळा नाही,समजलं बाईंचा चा तास संपला आणि त्या बाहेर गेल्या ) शिवन्या : काय गं धनु काय केलं यांनी ? धनश्री : अरे काल परश्या बरोबर भांडण केली  गेट च्या बाहेर  इंग्रजी च्या सरांनी पहिलं होते तु लवकर घरी गेलीस मीपण तिथेच होतो काल सरांनी त्यांची नावं लिहून घेतली आणि सोडलं .म्हणून आज प्राचार्यांनी बोलावलं असेल  शिवन्या :पण भांडण करायचं कारण काय ? असं का केलं त्यांनी आणि तो परश्या नालायक आहे आपण ५वी पासून त्याच्या वर्गात होतो बरं झालं या वर्षी आपण वर्ग बदलला नाहीतर हिथे पण तेच केलं असतं . धनश्री : दुपारच्या सुट्टीत भेटला की विचार हर्ष ला नक्की काय झालं ते . शिवन्या :(हर्षकडे बघत असते )हो नक्की . इंग्रजी चे सर  वर्गात आले नेह...

ती -माझं पहिलं प्रेम (भाग २१वा )

Image
ती -माझं पहिलं प्रेम (भाग २१वा ) (सर्वजण प्राचार्यांच्या ऑफिस मध्ये जातात ,तिथे कालचे सर आणि परश्या व त्याचे मित्र होते ) सम्या : तुला म्हंटलं होतं कि प्राचार्य आपल्याला नक्की बोलवतील . आकाश : तु नको काही बोलु मध्ये फक्त मि सांगितलं की मान हलावं . सम्या : बरं बगतो काय करतोस ते आज . हर्ष : मला तर खुप भीति वाटते रे,आपलं काही खरं नाही आज . प्राचार्य : काय रे पोरांनो शाळेत शिकायला येता कि मारामारी करायला येता .पहिल्याचं दिवशी सर्वाना सुचना दिल्या होत्या तरी लगेच दुसऱ्या दिवशी मारामारी केली . आवि : सॉरी सर यांनीच सुरवात केली . परश्या : नाही सर यांनी आधी मला मारलं . प्राचार्य : गप्प बसा मी विचारेन तेवढच उत्तर दया . (हर्ष जरा त्यांना थोडा प्रामाणिक वाटला त्यामुळे त्याच्याकडे बगत ) तुझं नाव काय ? हर्ष : हर्षवर्धन  प्राचार्य : तु सांग काय झालं नेमकं . हर्ष : सर काल सकाळी आम्ही साइकल पार्किंग मध्ये लावत असताना आवि च्या साइकलचं समोरील चाक थोडा परश्या ला लागले, त्याबद्द्ल त्यानी माफी सुद्धा मागितली पन  त्यानी काही न विचार करता शिव्या देयाला सुरवात केली .मग आकाश ला र...

ती - माझं पहिलं प्रेम (भाग २०वा)

Image
ती -माझं पहिलं प्रेम  हर्षची आई : काय रे हर्ष मारामारी करुन आलास की काय ?  हर्ष : नाही गं  ! हर्षची आई : काय तुझा अवतार झालाय ? हर्ष : आरे ,ते शाळेतून घरी येताना समोरुन एक ट्रक वेगाने अला आणि रस्त्यावर पानी पण खुप होते मग आम्ही रस्त्याच्या बाहेर पाण्यात पडलो,म्हणुन कपडे खराब झाले. हर्षची आई : अरे देवा मग तुला काही लागलं नाही ना,ये जवळ बघुदे  मला . हर्ष : नाही गं आई काही नाही लागलं . हर्षची आई : बर चल हात पाय धुऊन ये,मी ठेवलायं तो पि आणि अभ्यास करायला बस. हर्ष : बरं आलोच . (तिसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे सर्वजण साइकल वर शाळेत जायला निघाले .दुसऱ्या दिवशी एक गोष्ट चांगली झाली होती तर दूसरी वाईट.आज काय नविन पराक्रम करतील बघुया ) हर्ष : यार आवि काल रात्रभर झोपच लागली नाही रे . आवि : का काय झालं . हर्ष : अरे तिला पहिल्यापासून कश्यात मनचं लागना. डोळे बंद जारी केले तरी तीच दिसते समोर .तीचा तो चेहरा सतत नजरे समोर येतो तिची स्माइल तिची ती अदा.तो रिमझीम पाऊस तो छत्रीतला क्षण .तिचा पहिला स्पर्श सरं काही असं वाटतयं कधी एकदा तिला पाहतोय असं झालाय तिला पह...

ती -माझं पहिलं प्रेम (भाग १९वा )

Image
ती -माझं पहिलं प्रेम (भाग १९वा ) (शाळेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्याच दिवशी मारामारी करुन आपल्या पुढच्या आयुष्यात त्यांनी अडचणी निर्माण केल्या होत्या, खरतर मारामारी करणे हा त्यांचा हेतु नव्हता परंतु कधी कधी  परिस्थिति अशी निर्माण होते कि ती गोष्ट करण्यास आपल्यालाही भाग पड़ते. आजची परिस्थिति आणि १०-१२वर्षापूर्वी च्या परिस्थितीत फार फरक जाणवतो आज एखादी चूक आपण केली कि सॉरी म्हंटल की ती गोष्ट तीथेच संपते "एक छोटा शब्द सॉरी खुप काही काम करतो " सुरुवात फक्त थोडासा पैंट ला दाग लागला म्हणून झाली पन शेवट ८जाणांचे पूर्ण कपडे खराब करण्यात झाला .आवि दाग लागल्यामुळे परश्याला सॉरी सुद्धा म्हंटला होता परंतु आपला अहंकार आपली फालतू जिद्द आणि मीपणा यात माणूस एवढा अडकलेला असतो की त्याला त्या पुढे काहीच दिसत नाही .जर परश्याने तिथेच माफ केलं असतं तर कदाचित त्याला नविन चार मित्र भेटले असते. )  आवि : आरे हरश्या आपल्या कपड्याची तर वाट लागली आता घरी काय सांगणार आपण  हरश्या :माझी तर खुप वाट लागेल आई जाम मारेल जर तिला समजलं आपण मारामारी केली तर . आवि :तुझी तुलाच मरेल माझी तर आपल्या सगळ्या...

ती - माझं पहिलं प्रेम (भाग १८वा )

Image
ती - माझं पहिलं प्रेम (भाग १८वा ) शेवटचा तास पिटी विषयाचा होता सर वर्गात येताच सगळेजण शांत झाले .सर खुप शिस्तप्रिय आणि कडक होते .शाळेच्या शिपायाकडे कधी काठी नासायची,पन यांच्याकडे मोठी कलकीची काठी असायची नेहमी.शाळेच्या आवारात कोणी नियमांचे उलघंन करताना दिसला की त्याला तिथेच ठोकला . आज पहिलाच दिवस होता त्यामुळे त्यांच्या हातात छड़ी नव्हती.आल्यावर त्यानी काल दिलेल्या सुचना पुन्हा सांगितल्या म्हणजे कोणी विसरलं असेल तर त्याच्या  लक्षात राहिल . त्यांनी सुद्धा सर्वांची ओळख विचारली, तासभर पुन्हा त्यात गेला .सर्वांची ओळख करुन झाल्यावर त्यांनी सर्वाना सांगितल अभ्यासाबरोबर क्रीड़ा विषयात सुद्धा तुम्ही भाग घेतला पाहिजे. आपल्या शाळेत वर्षभरात अनेक स्पर्धा होतात तुम्हीं सर्वांनि भाग घेणं गरजेचं आहे . अनेक पारितोषिक़ सुद्धा भेटतात.शाळेचं नावं तुमचं नावं यातूनच मोठं होत असतं . वंदे मातरम साठी घंटा झाली आणि सर्वजन उभे राहिले. ते संपताच सर्वांची निघायची घाई . बाहेर पाऊस सुरु होता. आवि : चला लवकर किती वेळ ?  आकाश : ये हर्षा शिवन्या गेली काय बग जा . हर्ष : अरे हो रे (तो शिवन्या ला ...