ती -माझं पहिलं प्रेम (भाग २३वा )

ती माझं पहिलं प्रेम




(४वाजुन गेले होते शाळा सुटली होती, थोड़ा थोड़ा पाऊस होता सर्वानी रेनकोट घातले होते आणि सर्वजण त्या पाऊसातुन घरी निघाले . पाऊस सुरु होऊन १५दिवस जास्त झाले होते .आणि कोकणात राहणाऱ्या माणसाला निसर्ग हा आपला जिवलग मित्र वाटतो .हिरवाई ही कोकणाची ओळख तर शिवाय निसर्गाने या मातीला दिलेली देणगी . हिरवा निसर्ग पाने, फुले, नदया डोंगर हे सर कही कोणालाही भुलउन  टाकतो .पहिल्या पाऊसात मन मोहावून टाकनारा मातीचा सुगंध.प्रत्येकाला हवाहवासा वाटतो .आणि असं चित्र समोर दिसलं कि,संजय माने सरांची कविता आठवते

हिरवा निसर्ग 
भिजली माती पिकले मोती 
रानपाखारे खुशित गाती 
मंद उसासे टाकी धरती 
दाटून येता नभं हे वरती 

दुथडी भरून नदया वाहती 
दोन तिरांना कवेत घेती 
मुले, फुले आन मने नाचती 
उत्साहाला येई भरती 

हिरव्या रानी पाचू फूलती 
कोकिलस्वार हे मनी गुंजती 
आठवता मायेची नाती 
नववधुचे डोळे भिजती .

सम्या : यार हरश्या  दोन दिवसात खूपच जवळची मैत्री केलिस रोज एका छत्रीत जाता.मज्जा आहे तुझी आम्ही तिथे रोज प्रयत्न करतोय तरी कोणी भाव देइना .

हर्ष: अरे नाही रे .

आवि :नाहीतर काय बघ .आज काय बोलत होती ती हरश्या ?

हर्ष : अरे सहज परश्या बरोबर भांडणं का केली होती म्हणून .

आवि : अजुन ?

हर्ष : सांगत होती तो खुप भांडखोर आहे त्याच्या नादाला नका लागु, अभ्यासात लक्ष दे काळजी घे बस एवढाच

सम्या : खुपच काळजी घेते तुझी .

आवि : तीची विकेट पडली राव तुझ्या प्रेमात.

हर्ष : काहीही चला उशीर होतोय

To be continued ........

Sudesh jadhav

Comments

Popular posts from this blog

स्कूलवाली -माझ पहिलं प्रेम (भाग 01)

ती - माझं पहिलं प्रेम (भाग 10)