ती - माझं पहिलं प्रेम (भाग 10)

ती - माझं पहिलं प्रेम

आकाश  :अजून का थोड़ा थांबलो असतो तर काय खरं नव्हतं माझं कधीपासून लागली होती,पण काय त्या बाईं सोडायलाच तयार नाहीत.
आवि : नाहीतर काय. मला तर बाईंनी ओळख सांगायाला उभं केलं तेव्हाच झाली होती, चल लवकर शौचालय कुठे आहे काय माहिती. ये सम्या , ये हर्षा उठा 15 मिनिटात पुन्हा येयाचं आहे चला लवकर .
सम्या : आरे हो का तुम्हाला घाई लागल, काही कळत नाही.
आकाश :अरे नालायका तुला नाही समजणार प्रेशर किती आलाय?  आणि जरा बाहेर बघं किती हिरवगार असा निसर्ग  पसरलाय, काय ही देवाची किमया, किती प्रयत्न केलं असतील देवानं ..
आवि : कुठे आहे 
आकाश : अरे नालायका वरती काय नानाची टांग बगतोयस,समोर बघं समोर .
सम्या : अरे त्या १०वीतल्या मूली आहेत,तू केवढा त्या किती मोठ्या. १०वी पास झाल्या की बाप त्यांच्या लग्न लाऊन देईल, आणि तुला तर आजुन चड्डीची नाड़ी बानता येत नाही. त्यांच्या मांगे नको लागु .
आकाश : मि कुठं म्हंटल मला लग्न करायचं आहे . मोठ्या तर मोठ्या, उलट मोठ्या पोरी जास्त समजूदार असतात लगेच हो म्हणतात आणि लगेच सोडतात जास्त टेंशन नसतं डोक्याला . आपल्यासाठी प्रेम म्हणजे फ़क्त " टाइमपास " मला कुठे शिकून डॉक्टर होयाचायं ? काय हर्षा 
हर्षा : प्रेम म्हणजे काय ? दोन देह एक श्वास...... म्हणजे प्रेम .
मानातील नाजुक कळी , सुवासिक सुंदर फुल, हृदयातील निशब्द भावना, तिची आकस्मित नजर , आठवण तिच्या स्मित हास्याची, पहाटेचे सोनेरी स्वप्न, किनार्यावरील बेधुंद वारा, सागरी लाट किनार्याची तिला आस, हळुवार जपणारा फुलपाखरू, ती नसताना जवळ असल्याचा भास , तिचा निरागस स्पर्श , ओठावरील अबोल भावना,जणु अप्सरेची एक झलक, तिच्या चेहऱ्यावरील कोहिनूरची चमक, तिला रोज पाहण्याची ओढ़, पौर्णिमेच्या चंद्राचा शीतल प्रकाश, शांत मनातील सुखद स्वर, वर्तमानात घडणारा इतिहास, मनाचे मनाशी नाते, अनोळख्या व्यक्तीशी ओळखीचे नाते, तुझ्यासारखा टाइमपास न करता आयुष्यभर हवी असणारी साथ, तिचे माझ्या स्वप्नातिल अस्तित्व,माझ्यासाठी जणू मृगजळ, माझ्या मनातील रंगीत चित्र, ती आणी मी आणखी कोणीच नाही.म्हणजे प्रेम पनं तुला नाही कळणार .जा तु प्रेशर कमी करुन ये .
आकाश : तसं सांग ना एवढा मोठा लेक्चर कश्याला देयाचा. अणि तु कधी प्रेम केलसं 
हर्षा :नाही अजुन तरी नाही, पनं जेव्हा प्रेम करेन ना तेव्हा पूर्ण  शाळा माझ्या प्रेमात पडेल. प्रेमात टाइमपास करावा टाइमपास म्हणून प्रेम नाही .
आवि : चल याला प्रेम होण्याअगोदर जाऊन येऊ .
(मधली सुट्टी संपली आणि सर्वजण वर्गात आले . आता मात्र दूसरे शिक्षक आले होते,इंग्रजी शिकवणारे दिसायला तसे थोड़े प्रेमळ होते पनं अातुन एकदम कडक , हुशार होते . त्यांनी सुद्धा त्यांची ओळख सांगितली मग पुन्हा सर्वांची नांव गांव विचारले सर्वाना शाळेबद्दल माहिती सांगितली आणि तासाभरातच पुन्हा जेवणासाठी सुट्टी झाली .)






Comments

Popular posts from this blog

स्कूलवाली -माझ पहिलं प्रेम (भाग 01)