ती -माझं पहिलं प्रेम (भाग २२वा )
(वर्गात आल्यावर सगळेजण आप-आपसात चर्चा करत होते प्रत्येकजण तर्क लावत होता काल केलेली मारामारी चा विषय वर्गात पोहचला होता काही विद्यार्थ्यांना त्याची कल्पना होती तर काही जन त्यावेळी तिथे उपस्थित होते . बाईंनि सुद्धा त्यांना बजाउन सांगितले असेल धंदे हिथे चलणार नाहीत नाहीतर हाकलून देतील शाळेतून ही झेड पि ची शाळा नाही,समजलं बाईंचा चा तास संपला आणि त्या बाहेर गेल्या )
शिवन्या : काय गं धनु काय केलं यांनी ?
धनश्री : अरे काल परश्या बरोबर भांडण केली गेट च्या बाहेर इंग्रजी च्या सरांनी पहिलं होते तु लवकर घरी गेलीस मीपण तिथेच होतो काल सरांनी त्यांची नावं लिहून घेतली आणि सोडलं .म्हणून आज प्राचार्यांनी बोलावलं असेल
शिवन्या :पण भांडण करायचं कारण काय ? असं का केलं त्यांनी आणि तो परश्या नालायक आहे आपण ५वी पासून त्याच्या वर्गात होतो बरं झालं या वर्षी आपण वर्ग बदलला नाहीतर हिथे पण तेच केलं असतं .
धनश्री : दुपारच्या सुट्टीत भेटला की विचार हर्ष ला नक्की काय झालं ते .
शिवन्या :(हर्षकडे बघत असते )हो नक्की .
इंग्रजी चे सर वर्गात आले नेहमीप्रमाणे सर्वांनी त्यांच स्वागत केलं .
सर : सर्वांनी लक्ष्यात ठेवा आपण हिथे शिकायला येतो टाइमपास मारामारी करायला नाही येत. त्यामुळे पुन्हा असले प्रकार होता कामा नयेत समजलं .आज आपण ग्रामर शिकणार आहोत मग दोन दिवसांनी पुस्तकातील शिकवायला घेऊ .
चला तुमची वही काढ़ा .
(दुपारची सुट्टी झाली शिवन्या अणि धनु नेहमी प्रमाणे घरी जेवायला गेल्या हर्ष आणि त्याचे मित्र वर्गातच डब्बा खात बसले होते .)
आकाश : तुम्हाला बोलो होतो ना, आपली चूक नहिये मग सर आपल्याला ओरडणार नाहीत .
हर्ष :आरे हो पण पुन्हा मारामारी नको यार बघितलस ना इंग्रजी चे सर कसे बोलत होते आपलं नाव खराब झालं तर परीक्षेत आपल्याला उगाचच कमी मार्क देतील याचं काही सांगता येत नाही .
आकाश : आरे नको टेंशन घेऊस चल खा लवकर शिवन्या येईल बाहेर बसु काल सारखं बघुया आज काय बोलते ती .
हर्ष : हो रे अधिच आपण भांडणं केलित आज .
(डब्बा खाऊन सर्वजण गेट च्या बाहेर झाडाखाली कट्यावर बसले होते, सम्या ने कुरकुरे आणले होते समोरच्या दुकानातून मग सर्वजण ते खात गप्पा मारत बसले होते. )
आवि : ये हरश्या ते बग तुझं फुलपाखरु आलं नाचतच येते.
(शिवन्या त्यांच्या जवळ आली )
शिवन्या : काय रे मारामारी करुण आता काय कुरकुरे खाता काय ?
सम्या : तु खाणार का ?
शिवन्या : नाहि नको थैंकू हर्ष चल वर्गात जाऊ .
हर्ष :चल आलोच , तुम्ही या निवांत रे
आवि :हो जा तु आम्ही येतो पाखरं बघून तु जा तुझ्या ........
शिवन्या : काय रे का मारामारी केलित ?
हर्ष : काही नाही गं! त्या हर्ष ला आवि च्या साईकल चा चाक़ लागला थोडा तर लगेच शिव्या दिल्या मग आकाश ने दोन वाजवल्या म्हणून संध्याकाली पोरं घेऊन आला होता आणि मारामारी केलि .पण आज प्रचार्यांनी चांगली घेतली त्याची .
शिवन्या : बरं केलस खुप माज आहे त्याला नुसती मारामारी करतो .
हर्ष : हो ना
शिवन्या : पण तु जास्त लक्ष्य देऊ नकोस अभ्यासात लक्ष्य दे आणि स्वताची काळजी घे जरा. चल बाय .
to be continued ..............
तुमच्या सर्वांचे आभार असच प्रेम असूद्या शेयर करा कमेंट करा आणि काळजी घ्या .
सुदेश सूर्यकांत जाधव
Comments
Post a Comment