ती -माझं पहिलं प्रेम (भाग २१वा )

ती -माझं पहिलं प्रेम (भाग २१वा )


(सर्वजण प्राचार्यांच्या ऑफिस मध्ये जातात ,तिथे कालचे सर आणि परश्या व त्याचे मित्र होते )
सम्या : तुला म्हंटलं होतं कि प्राचार्य आपल्याला नक्की बोलवतील .
आकाश : तु नको काही बोलु मध्ये फक्त मि सांगितलं की मान हलावं .
सम्या : बरं बगतो काय करतोस ते आज .
हर्ष : मला तर खुप भीति वाटते रे,आपलं काही खरं नाही आज .
प्राचार्य : काय रे पोरांनो शाळेत शिकायला येता कि मारामारी करायला येता .पहिल्याचं दिवशी सर्वाना सुचना दिल्या होत्या तरी लगेच दुसऱ्या दिवशी मारामारी केली .
आवि : सॉरी सर यांनीच सुरवात केली .
परश्या : नाही सर यांनी आधी मला मारलं .
प्राचार्य : गप्प बसा मी विचारेन तेवढच उत्तर दया .
(हर्ष जरा त्यांना थोडा प्रामाणिक वाटला त्यामुळे त्याच्याकडे बगत ) तुझं नाव काय ?
हर्ष : हर्षवर्धन 
प्राचार्य : तु सांग काय झालं नेमकं .
हर्ष : सर काल सकाळी आम्ही साइकल पार्किंग मध्ये लावत असताना आवि च्या साइकलचं समोरील चाक थोडा परश्या ला लागले, त्याबद्द्ल त्यानी माफी सुद्धा मागितली पन  त्यानी काही न विचार करता शिव्या देयाला सुरवात केली .मग आकाश ला राग आला व त्यानं  परश्या ला विचारले असता त्याला सुद्धा तो शिव्या देयाला लागला मग रागत परश्या म्हणाला संध्याकाळी भेटा तुम्हाला दाखवतो .त्यानंतर जेव्हा आम्ही संध्याकाळी जेव्हा घरी जायला निघालो तेव्हा गेटच्या बाहेर परश्या व त्याचे मित्र  बाहेर आमची वाट बघत होते आणि आम्ही जवळ गेलो तशी त्यांनी आम्हांला मारायला सुरवात केलि .इंग्रजी चे शिक्षक आले म्हणून आम्ही वाचलो .
प्राचार्य : बरं ठीक आहे . काय रे बरोबर आहे का  परश्या (परश्या मान खाली घालून उभा होता ) आई -वडील तुला शिव्या देयाला शिकवतात का ?
शिपाई : सर हा आपल्या शाळेच्या जवळच राहतो, विश्वासरांवांचा मुलगा माझी सभापती .
प्राचार्य :तरीच एवढी मस्ती दिसते . माफी मांग यांची .
परश्या : सॉरी सर .
प्राचार्य : माझी नाही यांची .आणि पुन्हा असं करणार नाही म्हणून सांग .
परश्या : सॉरी मित्रांनो .
प्राचार्य : आता सर्वाना एकमेकांना हात मिळवा व आजपासून तुम्ही एकमेकांचे शत्रु नाही मित्र समजा. आणि आपण शाळेत शिकायला येतो मारामारी करायला  नाही याचं भान असुद्या .
(सर्वजण एकमेकांना शेक हैंड करतात परंतु परश्या च्या चेहऱ्यावर अजुन राग दिसत होता )
प्राचार्य :कांबले परश्या च्या वडिलांना दुपारी बोलाऊन घ्या आता जरी हा शांत बसला असला तरी पुन्हा तो काहीतरी नक्की करेल त्यापेक्षा त्यांच्या कानावर घातलेलं बरं .
जा आता सर्वांनी आप -आपल्या वर्गात ..........
To be continued ......


Comments

Popular posts from this blog

स्कूलवाली -माझ पहिलं प्रेम (भाग 01)

ती - माझं पहिलं प्रेम (भाग 10)