ती -माझं पहिल प्रेम (भाग २४वा )




ती -माझं पहिलं प्रेम (भाग २४वा )







चार दिवस झाले होते,शुक्रवार कधी आला हे त्यांना समजलेच नाही नेहमी प्रमाणे हर्ष आणि त्याचे मित्र शाळेत रमत गमत मस्ती मज्जा करत आप -आपल्या साइकल वर स्वार होऊन निघाले . मुख्य रस्त्यापासून शाळेत जाण्यासाठी दोन रस्ते होते एक पक्का रस्ता होता तर एक शेताच्या बांधावरुन शॉर्टकट होता. शाळेच्या रस्त्याजवळ आले,शिवन्या त्या शेताच्या बांधावार काहीतरी करताना आवि ला दिसली .

आवि :ये हर्षा साईकल थांबव ती बग शिवन्या काय करते तिथे ?

हर्ष :(सर्वजन साइकल तिथेच थांबवतात ) अरे हा ! एका तुम्ही जा पुढ़े  मी बगतो तिला .

सम्या :  आता काय आइटम भेटली आता मित्राना हो पुढे .

हर्ष :अरे नाही रे भाव आहेस तु आपला जा पुढे आवि साईकल घेऊन जा मी तिच्या सोबत चालत येतो .

आवि :ओके भावा बेस्ट ऑफ लक .ये लवकर 

हर्ष :हो आलोच .

(हर्ष तिच्या जवळ जातो )

हर्ष :हाय गुड मॉर्निंग !!!!!!!!

शिवन्या : गुड मॉर्निंग तु आहेस का पन तु आज चालत आलास 

हर्ष :अरे नाही नाहीं तुला पहिलं म्हणून हिथे अलो तु काय करतेस ते बघायला माझे मित्र पुढे गेले माझी साइकल घेऊन 

शिवन्या : आसं आहे का बरं 

हर्ष :पन तु काय करत होतीस हिथे ?

शिवन्या : आरे मी रोज या बांधावरून येते जाते हिथे एक झाड होते छोटं काजुच आज कोणीतरी येताना त्यावर पाय दिला होता बिचारं जमिनीवर पडलं होते .  तो पन एक जिव आहे ना त्याला पण त्रास होत असेल ना म्हणून थोडा त्याला काठीचा आधार दिला आणि उभं केलं .

हर्ष :एवढं प्रेम करतेस झाडांवर( वृक्षावर ) ? 

शिवन्या : त्यांच्यावरच असावं म्हणजे निदान सुख तरी भेटल  शेवटी ते आहेत तर आपण आहोत . आणि त्याना त्रास झालेला मला सहन होत नाही .मला हा निसर्ग ही हिरवीगार झाडे खुप आवडतात खुप प्रेम करते मी त्यांच्यावर . 

हर्ष :मला पन आवडतात झाडे लावायला .

शिवन्या : कीती लावलीस मग ?

हर्ष :ते नाही आठवत पन खुप लावलेत .

शिवन्या : नातं आणि झाड नुसतं लाऊन उपयोग नाही त्याची काळजी पण तेवढीच घ्यावी लगाते नाहीतर दोन्ही सुकून जातात .म्हणून नुसती झाडं लाऊ नकोस त्यांची काळजी पन घे .

हर्ष : बरोबर आहे तुझं एक झाड लवणार नाहीत मात्र तोडणार अनेक.

शिवन्या :आता बग ना हेच झाड़ किती छान आहे तरी सुद्धा नालायक लोकानी त्यावर पाय दिला किती मुर्ख माणसं आहेत .



निसर्गासारखा नाही रे सोयरा
गुरू सखा बंधू मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप
मिटती क्षणात आपोआप

त्याच्या संगतीत फिटतो संदेह
वितळतो क्षोभ माया मोह
त्याच्या संकीर्तनी मुरविता देह
भेटतो उजेड अंतर्बाह्य

त्याच्या स्मरणाने प्रकाशते मन
उजळते जग क्षणकाली
स्थिरावते पुन्हा चळलेले चित्त
पुन्हा मूळ वाट पायाखाली


To be continued ........

सुदेश सूर्यकांत जाधव 





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्कूलवाली -माझ पहिलं प्रेम (भाग 01)

ती - माझं पहिलं प्रेम (भाग 10)