ती - माझं पहिलं प्रेम (भाग १८वा )

ती - माझं पहिलं प्रेम (भाग १८वा )



शेवटचा तास पिटी विषयाचा होता सर वर्गात येताच सगळेजण शांत झाले .सर खुप शिस्तप्रिय आणि कडक होते .शाळेच्या शिपायाकडे कधी काठी नासायची,पन यांच्याकडे मोठी कलकीची काठी असायची नेहमी.शाळेच्या आवारात कोणी नियमांचे उलघंन करताना दिसला की त्याला तिथेच ठोकला .
आज पहिलाच दिवस होता त्यामुळे त्यांच्या हातात छड़ी नव्हती.आल्यावर त्यानी काल दिलेल्या सुचना पुन्हा सांगितल्या म्हणजे कोणी विसरलं असेल तर त्याच्या  लक्षात राहिल . त्यांनी सुद्धा सर्वांची ओळख विचारली, तासभर पुन्हा त्यात गेला .सर्वांची ओळख करुन झाल्यावर त्यांनी सर्वाना सांगितल अभ्यासाबरोबर क्रीड़ा विषयात सुद्धा तुम्ही भाग घेतला पाहिजे. आपल्या शाळेत वर्षभरात अनेक स्पर्धा होतात तुम्हीं सर्वांनि भाग घेणं गरजेचं आहे . अनेक पारितोषिक़ सुद्धा भेटतात.शाळेचं नावं तुमचं नावं यातूनच मोठं होत असतं . वंदे मातरम साठी घंटा झाली आणि सर्वजन उभे राहिले. ते संपताच सर्वांची निघायची घाई . बाहेर पाऊस सुरु होता.
आवि : चला लवकर किती वेळ ? 
आकाश : ये हर्षा शिवन्या गेली काय बग जा .
हर्ष : अरे हो रे (तो शिवन्या ला शोधण्याचा प्रयत्न करतो पन ती निघून गेलेली असते ) नाही दिसत कुठे ती, चला जाऊ .
(सर्वजण आपली साइकल काढ़त गर्दीतून बाहेर निघत होते.गेट च्या बाहेर पडले तोच समोर परश्या आपल्या चार मित्रांसोबत यांची वाट बघत उभे होते) 
हर्ष : सम्या सकाळी परश्या बोला होता संध्याकाळी बाहेर भेट,आता भेटा त्याला.
आकाश: हर्ष तु जा शिवन्या ला शोध मी यांना ठोकतो .
हर्ष: नाही रे  पाहिले मित्र मग आइटम . चल मीपण ठोकतो याला 
सम्या : चला रे .    
परश्या : या तुमचीच वाट बघतोय सकाळी जाम माज अला होता ना आता दाखव तुझा माज ( आकाश कडे बोट दाखवत ) रोशन  हाच तो जास्त माज दाखवत होता याला ठोका पहिला . 
रोशन: काय रे लय माज आलय व्हय तुला (आणि एका हाताने आकाश ची कॉलर पकडतो व त्याला मागे ढकलतो आकाश रस्त्यावरच्या पाण्यात पडतो तोच हर्ष पुढे येऊन रोशनला मागे ढकलून देतो तो सुद्धा पाण्यात पड़तो .परश्या हर्ष ला मारायला जवळ येतो सम्या त्याच्या मध्ये येतो .परश्या समिर ची कॉलर पकडून त्याला खाली पडतो .पुन्हा रोशन आणि त्याचे मित्र केतन आणि सुमित हर्ष ला मारायला जवळ येतात आकाश रोशन च्या दोन काना खाली वाजवतो आणि एकमेकाना ते मारत होते .आजूबाजूला एकच गर्दी होते .इंग्रजी चे सर तिथे पोहचतात. मग बाकीचे सुद्धा त्याची भांडण सोडवाचा प्रयत्न करतात .भांडण सोडवल्यावर सर त्या आठ जणांची नांव विचारतात.व त्याना घरी जायला सांगतात. जर पुन्हा भांडण करताना दिसलात तर तुमचं काही खरं नाही .तेव्हा सर्वजण तिथुन निघून जातात .
to be continue .......


Comments

Popular posts from this blog

स्कूलवाली -माझ पहिलं प्रेम (भाग 01)

ती - माझं पहिलं प्रेम (भाग 10)