ती -माझं पहिलं प्रेम (भाग १९वा )
ती -माझं पहिलं प्रेम (भाग १९वा )
(शाळेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्याच दिवशी मारामारी करुन आपल्या पुढच्या आयुष्यात त्यांनी अडचणी निर्माण केल्या होत्या, खरतर मारामारी करणे हा त्यांचा हेतु नव्हता परंतु कधी कधी परिस्थिति अशी निर्माण होते कि ती गोष्ट करण्यास आपल्यालाही भाग पड़ते. आजची परिस्थिति आणि १०-१२वर्षापूर्वी च्या परिस्थितीत फार फरक जाणवतो आज एखादी चूक आपण केली कि सॉरी म्हंटल की ती गोष्ट तीथेच संपते "एक छोटा शब्द सॉरी खुप काही काम करतो "
सुरुवात फक्त थोडासा पैंट ला दाग लागला म्हणून झाली पन शेवट ८जाणांचे पूर्ण कपडे खराब करण्यात झाला .आवि दाग लागल्यामुळे परश्याला सॉरी सुद्धा म्हंटला होता परंतु आपला अहंकार आपली फालतू जिद्द आणि मीपणा यात माणूस एवढा अडकलेला असतो की त्याला त्या पुढे काहीच दिसत नाही .जर परश्याने तिथेच माफ केलं असतं तर कदाचित त्याला नविन चार मित्र भेटले असते. )
आवि : आरे हरश्या आपल्या कपड्याची तर वाट लागली आता घरी काय सांगणार आपण
हरश्या :माझी तर खुप वाट लागेल आई जाम मारेल जर तिला समजलं आपण मारामारी केली तर .
आवि :तुझी तुलाच मरेल माझी तर आपल्या सगळ्यांना मरेल .
आकाश : थांब जरा मला विचार करू दे ?
सम्या : आता कसला विचार करतोस .नशीब रेन कोट होता नाहीतर आपली बैग सुद्धा पाण्यात भिजली असती .
हर्ष: नाहीतर काय .
आकाश : अरे मी काय करणार मग त्यांना मारने गरजेचं होतं नाहीतर त्यांनी आपल्याला नेहमी त्रास दिला असता
आवि :थैंक्स यार तु होतास म्हणून नाहीतर त्यांनी आपल्याला नक्कीच मारलं असतं .
आकाश :बरं ऐका जर घरी विचारलं तर सांग कि घरी येताना समोरून एक गाडी वेगानी आली आणि आम्ही रस्त्याच्या बाहेर पाण्यात पडलो ओके .
सम्या :बर चला आता खुप वेळ झाला आहे .
to be continued ........

Comments
Post a Comment