ती - माझं पहिलं प्रेम (भाग २०वा)

ती -माझं पहिलं प्रेम 



हर्षची आई : काय रे हर्ष मारामारी करुन आलास की काय ? 

हर्ष : नाही गं  !

हर्षची आई : काय तुझा अवतार झालाय ?

हर्ष : आरे ,ते शाळेतून घरी येताना समोरुन एक ट्रक वेगाने अला आणि रस्त्यावर पानी पण खुप होते मग आम्ही रस्त्याच्या बाहेर पाण्यात पडलो,म्हणुन कपडे खराब झाले.

हर्षची आई : अरे देवा मग तुला काही लागलं नाही ना,ये जवळ बघुदे  मला .

हर्ष : नाही गं आई काही नाही लागलं .

हर्षची आई : बर चल हात पाय धुऊन ये,मी ठेवलायं तो पि आणि अभ्यास करायला बस.

हर्ष : बरं आलोच .

(तिसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे सर्वजण साइकल वर शाळेत जायला निघाले .दुसऱ्या दिवशी एक गोष्ट चांगली झाली होती तर दूसरी वाईट.आज काय नविन पराक्रम करतील बघुया )

हर्ष : यार आवि काल रात्रभर झोपच लागली नाही रे .

आवि : का काय झालं .

हर्ष : अरे तिला पहिल्यापासून कश्यात मनचं लागना. डोळे बंद जारी केले तरी तीच दिसते समोर .तीचा तो चेहरा सतत नजरे समोर येतो तिची स्माइल तिची ती अदा.तो रिमझीम पाऊस तो छत्रीतला क्षण .तिचा पहिला स्पर्श सरं काही असं वाटतयं कधी एकदा तिला पाहतोय असं झालाय तिला पहिल्या शिवाय हा जीव काय शांत होणार नाही बाग.

सम्या : आम्हाला हिथे कालची मारामारी अजुन आठवते .आज मास्तरांनी प्राचार्याकडे नेलं नाही तर नशीब आपलं नाहीतर काय खर नाही आपलं .आणि याला ती आठवते .

आकाश : सम्या तु जास्त टेंशन नको घेऊ,सुरुवात त्यांनी केली आपली काही चूक नाहीये ओके बघु काय होईल ते .

आवि :मला पण खुप भीती वाटते ते .आपली वाट लागेल यार .

आकश : आवि तु शांत बस शाळेत गेल्यावर बघु तु काय बोलु नकोस मी बोलेन कोणी काही विचारलं तर.

(नेहमीप्रमाणे राष्ट्रगीत झालं व सर्वजण वर्गात गेले )

सम्या : हर्षा तुझं फुलपाखरु बग आज शाळेच्या यूनिफार्म मध्ये आलयं !

हर्ष : (तिच्याकडे बगत ) आज पण खुप छान दिसते रे दोन वेण्या पण खुप छान घालून आले 

(वर्गशिक्षिका नेहमीप्रमाणे हजेरी घेत होत्या हर्ष मात्र तिच्याकडे पाहण्यात व्यस्त होत्या .तोच मैडम नि हर्ष आणि चं नाव पुकारलं हा मात्र तिलाच बघत बसला होता )

वर्गशिक्षिका : हर्ष .हर्ष (सम्या त्याला हलावतो )

हर्ष : प्रेजेंट टीचर .

वर्गशिक्षिका : लक्षं कुठे आहे तुझं .

हर्ष : सॉरी टीचर .

वर्गशिक्षिका : वर्गात आहात जरा भान ठेवा .

हर्ष : हो टीचर .

(तेवढ्यात शिपाई वर्गात येतो )

वर्गशिक्षिका :बोला कांबले काय झालं 

शिपाई : बाई तुमच्या वर्गातील ४पोरांना प्राचार्यांनी बोलावले आहे .

वर्गशिक्षिका : नावं सांग त्यांची ?

शिपाई : हर्ष, समीर, आकाश आणि अविनाश.

to be continued ......



Sudesh suryakant jadhav






















Comments

Popular posts from this blog

स्कूलवाली -माझ पहिलं प्रेम (भाग 01)

ती - माझं पहिलं प्रेम (भाग 10)