ती - माझं पहिलं प्रेम (भाग 08)

                        ती - माझं पहिलं प्रेम ...... 

( सर्वजण अप-आपल्या वर्गात निघून गेले, रोजच्या पेक्षा आज जरा जास्तच उशीर झाला होता)

हर्ष - एवढा वेळ आयुष्यात पहिल्यांदा उभा राहिलो असेल बग.
सम्या: तर काय? मी तर पुस्तकात हिटलर वाचला होता आज प्रत्यक्ष दर्शन झाले.
एवढे नियम तर आर्मी सुद्धा नसतील.आकाशचं तर काय खरं  नाही जर का सापडलास ना तर सरळ घरी, च्या आईला.
आकाश : मस्तराच्या बापाचं राज्य आहे का ? असल्या फालतू धमक्याना मी घाबरतो काय, एकदा फक्त माझीं ड्रीम गर्ल भेटु दे मग बगतो मास्तर काय करतो ते.
अवि : तू नक्की मार खाणार बग, आपण शिकायला आलोय की पोरी पटवायला ?
हर्ष : चला लवकर नाहीतर वर्गशिक्षक आपल्या आगोदर  हजेरी लावतील .
(सर्वजण  वर्गात गेले, मस्तरांचा काय अजुन पत्ता नव्हता,त्यामुळे मुलांचा गोंगाट चालूच होता थोड्या वेळाने एक शिक्षिका वर्गात आल्या तसा मात्र वर्ग शांत झाला. मैं हूँ ना मधल्या सुष्मिता सेन सारखी एंट्री  करत मात्र मराठी चित्रपटांतील अभिनेत्री  अलका कुबल सारखा दिसायला लुक होता.आल्यावर त्यांनी त्यांची ओळख सांगितली.तेव्हा समजलं त्या मराठी शिकवतात व त्याच वर्ग शिक्षिका आहेत. त्यांचा आवाज मात्र खुपच मधुर होता. बोलताना असा वाटत होता की जणू काही कोकिलाच त्यांच्या तोडून बोलत होती .त्यानंतर त्यानीं प्रत्येकाला आप -आपली पूर्ण ओळख करुन देयाला सांगितली
ओळख करण्या मागचं मूळ कारण म्हणजे त्यांना सर्व मुलांना बोलक करणं एवढाच.सगळेजन आसपासच्या गावातील "मराठी शाळेत शिकलेली पोरं "
त्यामुळे एवढ्या पोरांसमोर बोलणं म्हणजे फार अवघड गोष्ट तरीपण अडखळत अडखळत बोलण्याचा प्रयत्न करत प्रत्येकजण  आपली ओळख सांगत  त्यामूळे त्या बाईंना सुद्धा अंदाज़ अला असेल कोण कीती पाण्यात आहे ते व मुलांना सुद्धा नविन मित्रांची थोडिफार माहिती होते.
ओळख आणि नावं बऱ्यापैकी समजली होती . त्यानंतर बाईंनी पुढचा विषय काढला वर्ग प्रतिनिधि.
वर्गशिक्षिका : तर आपली सर्वांची  ओळख बऱ्यापैकी झालेली आहे. आता आपल्याला वर्ग प्रतिनिधि निवडायचा आहे जो आपल्या वर्गावर लक्ष ठेवेन
रोजच्या रोज मुलांची हजेरी घेण त्यांच्यावर लक्ष ठेवणं वर्गात शिक्षक नसतील तर वर्ग शांत ठेवणं रोज बोर्ड अपडेट ठेवणं आणि सर्वाना काही मदत लागली तर हेल्प करणं .जे  कोणी इच्छुक असतील त्यांनी पटकनं उभ रहा.
( आता एवढ्या जबाबदाऱ्या म्हटल्यावर कोणी जागेवरून उठेना आणि वर्गप्रतिनिधि हा हुशार असावा, काहीवेळ वाट पहिली पन कोणीच उभ राहिलं नाही मग बाईंना काही सुचेना त्यासुद्धा शांत तेवढ्यात मागुन आकाश चा आवाज आला
आकाश : बाई एवढ्या जबाबदाऱ्या म्हणजे प्रतिनिधि तसा हुशार हवा ना मग मागच्या वर्षी कोणाला जास्त मार्क्स भेटलेत त्यांना उभं करा आणि विचारा ना कोनी होतयं काय नाहीतर त्यांची नावं कागदावर लिहून एक निवडा सोपं आहे .
वर्गशिक्षिका : हा चांगली कल्पना आहे. काय नाव काय तुझं ?
आकाश : बाई "आकाश "
वर्गशिक्षिका : तुला किती मार्क्स आहेत
आकाश :36%
वर्गशिक्षिका : ये पुढे ये आकाश.
आकाश : नाही  नको बाई नको.....
वर्गशिक्षिका : घाबरू नकोस तुला नाही करत ये पुढे .
आकाश : बरं आलो
(मग बाई वर्गातील हुशार मुलांना उभं करतात 5-6जन असतात बाई आकाशला त्यांची नावे कागदावर लिहायला सांगतात त्यानंतर बाई एक कागद उचलतात नाव असतं "स्नेहल "



      




















Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्कूलवाली -माझ पहिलं प्रेम (भाग 01)

ती - माझं पहिलं प्रेम (भाग 10)