ती - माझं पहिलं प्रेम (भाग १७वा )

ती -माझं पहिलं प्रेम (१७वा भाग

दुपारचे २वाजले होते सर्वजण जेवण करुन वर्गात आले होते.हर्ष आजुन स्वपांच्या दुनियेत फिरत होता सगळेजण विचारात होते काय झाल काय म्हणाली ती ?
आकाश : काय रे काय झालं ? काही विचारलं का तिने? सांग 
हर्ष : यार तिने बोलावलं तेव्हा जाम घाबरलो होतो, नंतर तिनं मला जबरदस्ती छत्रीत घेतलं. तेव्हा कीती भारी वाटत होतं.तिचा पहिला स्पर्श.जणू काही गुलाबाच्या फुलानी आपल्याला स्पर्श केला . 
सम्या : असं काय असतं त्या स्पर्शात. नार्मल गोष्ट आहे ती.
हर्ष : तुला नाही कळणार कारण तुला आजुन तो स्पर्श झाला नाही .पहिलं प्रेम आणि पहिला स्पर्श याचं नातं आणि त्यातली मज्जा वेगलीच असते ती शब्दात नाही सांगता येत . तिला अनुभवल्या शिवाय नाही समजनार त्यामधील थरार गम्मत आणि उचंबुन येणाऱ्या भावना. एक वेगलीच मज्जा असते त्यात प्रत्येकांनी आयुष्यात याचा अनुभव नक्की घेयाला हवा .मी खुप भाग्यवान आहे मला एवढ्या लवकर तो भेटला .
आवि : आम्ही कमनशीबी आमची कुठं गर्लफ्रेंड आहे तुझ्या सारखी .
हर्ष : अरे नाही रे तुला पन भेटेल बाळा.




(कलेचे सर वर्गात आले. गुड आफ्टरनून म्हणत सर्वांनी त्यांच स्वागत केलं. मग सर्वांची विचारपूस करत सरांनी कालचा होमवर्क विचरण्यास सुरवात केली. प्रत्येकाला सरांनी उभं करुन नावं विचारयाला सुरुवात केली. कोणी बरोबर तर कोणी चुकीची उत्तर देत होतं मग सरांनी शिवन्या ला उभं केलं काय योगयोग तिला हर्षचं नाव आणि % विचारले. तिने मात्र अचूक उत्तर दिलं. हर्षचे मित्र चकित झाले . मग सरांनी सर्वंना चित्रकलेची मोठ्या साईज़ ची नोटबुक घेतली का विचारलं आणि होमवर्क साठी विषय दिला "अचानक आलेला पाऊस आणि सर्वांची झालेली धावपळ "  आणि घंटा वाजली )


to be continued .......



आपल्या प्रत्येकाला आपलं पहिलं प्रेम,पहिला स्पर्श, पहिली बियर, पहिली सिगरेट आयुष्यभर लक्षांत  असते .आणि नेहमी आपल्या आठवणीत त्या गोष्टि नेहमी आपल्याला आनंद देत असतात .तुम्हांला सुद्धा नक्की काही आठवलं असेल.

                                         तुमच्या सर्वांचे अभार !


                                                                                                                 सुदेश सूर्यकांत जाधव 




Comments

Popular posts from this blog

स्कूलवाली -माझ पहिलं प्रेम (भाग 01)

ती - माझं पहिलं प्रेम (भाग 10)