ती - माझं पाहिलं प्रेम (भाग १६वा )

ती - माझं पाहिलं प्रेम (भाग १६वा )

(जेवनासाठी घंटा झाली शिक्षक वर्गाबाहेर गेले.आणि वर्गात पुन्हा गोंधळ सुरु झाला. धनश्री आणि शिवन्या घर जवळ असल्यामुळे  जीवनासाठी घरी जात.हर्ष आणि त्याचे मित्र वर्गात बसून जेवत होते. हर्ष आणि सम्या आकाश आणि आवि च्या बेंच टिफिन खायला गेले )
आकाश : काय रे तु काय डोक्यावर पडला काय हरश्या? तुझ्या प्रेमासाठी आम्ही आम्ही त्या महाराणी समोर नाकं घासायची आणि तु आमची मेहनत अशी धुळीत मिळवतोस.खाल्लीस ना माती प्रेमात सुरु होयाची आधीच प्रेमाचा बाजार करुन टाकलास . 
हर्ष : सॉरी यार तिच्यात एवढा गुंतलो होतो की मला माझचं भान राहिलं नाही रे .
सम्या : तिला काय वाटलं असेल ती तुला किती चांगलं समजते आणि तु माति खाल्लीस, मुर्ख माणूस .
आकाश : हे बगं  सोन्या आधीच ती मास्तराची पोर जर का त्याला समजलं ना तर तुझी बिना पाण्याची करेल .
सम्या : त्यात तुला अजुन आली पण नाही 
अवि : गप बस हिथे भाव टेंशन मध्ये आहे आणि याला जोक सुचतोय .
हर्ष : आता काय करायचं ते सांग !
आकाश : तुला ती आवडते ना 
हर्ष : हो म्हणजे काय ?
आकाश : मग जरा धीरानं घे पहिल्याच दिवशी असं केलं तर कसं होइल . टिफिन खाऊन झाला की आपण गेट च्या बाहेर जाऊ ती बाहेर नक्की भेटेल 
हर्ष : बरं 
(टिफिन खाऊन चोघें गेट च्या बाहेर फिरत असतात . रिमझिम रिमझिम पाऊस पड़त होता . गेट  च्या समोर एक आंब्याचं झाड होतं व त्याच्या खाली बसायला कट्टा, त्यावर चोघेंजण बसून तिची वाट पाहत होते .काहीवेळाने ती समोरून आली एका हातात छत्री होती तरीसुद्धा पाऊसात नाचत चलत होती त्यांच्या जवळ आली. तसा हर्ष उठला त्याने आवाज देण्यागोदरच तिनं आवाज दिला हर्ष ! आणि सर्वांची आता  ........होती 
हर्ष जवळ गेला आणि तिनं त्याला त्याला छत्रित येयाला सांगितलं हर्ष मात्र अतिशय लाजाळु तो काय छत्रीत जायला तयार नव्हता अधिक घाबरलेल्या आवस्तेत होता मानत प्रश्ननाचं वादळ उठलं होतं zp च्या शाळेत शिकलेलं मुलींपासून लांब राहणारं हे पोरगं अचानक एका सुंदर त्यांच्या स्वप्नातील मूली सोबत वास्तवात एका छत्रीत ही भावनाच त्याच्यासाठी खुप सुखदायक )
शिवन्या -काय रे एवढा काय लाजतोस (हर्ष चा हाथ ओडुन जवळ घेते ) माझं नाव का घेतलास
हर्ष : सॉरी चुकुन घेतलं .मलाच समजलं नाही कसं घेतलं .सॉरी हा शिवन्या .
शिवन्या : इट्स ओके हर्ष होतं असं आपण एखादयाचा जास्त विचार केला की होतं .
हर्ष :नाही असं काही चुकून आलं .
शिवन्या : जाऊदे चल पोहोचलो आपण वर्गाजवळ.
to be continued .....







Call for weight loss and gains -7448170817




Comments

Popular posts from this blog

स्कूलवाली -माझ पहिलं प्रेम (भाग 01)

ती - माझं पहिलं प्रेम (भाग 10)