ती - माझं पहिलं प्रेम (भाग 14)

शाळेचा दुसरा दिवस 




(हजेरी घेण्यातच मराठीचा तास सुरु झाला आणि संपला सुद्धा,  बगता बगता दोन लेक्चर झाले हर्ष चं लक्ष दोन तास झाले तरी जागेवर वर तो भर दिवसा तिच्या स्वप्नात फिरत होता .शाळेला सुरु होऊन दोन दिवसच झाले परंतु हर्ष या दोन दिवसातच आपलं लक्ष विसरला, आणि हितेच खरी सुरवात होते आपल्या आयुष्याची वाट लागण्यास.वाहत्या पाण्यातील देखील मासा गांडूळ खाण्याचा नादात सहज  गाळाला लागातो आणि आपलं आयुष्य गमावतो तसाच या 10-12 वर्षातील मुलांच्या बाबतीत होते . प्रेम म्हणजे काय ? याचा अर्थ देखील माहित नसतो.आकर्षणाच्या जाळ्यात अडकायाचे आणि आपलं आयुष्य बारबाद करायचे.
मधली सुट्टी झाली )
हर्ष - चल त्या दोघांना काय प्लान आहे तो सांगू ?
सम्या :हो चल .
(त्यांच्या जवळ जाऊन )
सम्या : ये आवि, आकाश एक  छोटं काम आहे,झाले तर दोघांना वडा पाव देईल हर्ष .
आकाश : काम बोल आधी काय आहे ते .
सम्या : हर्ष ला ती पोरगी आवडली आहे, ती कागदाचा गोला मारला होतास ती.तिच्यासोबत ओळख करुन पाहिजे म्हणतो हा, बग काही होतय काय ?
आकाश : मग काय करावं लागेल
सम्या : काही फार नाही फक्त हर्ष तुम्हां दोघांना घेऊन जाईल तीच्याजवळ तुम्ही फक्त सॉरी बोला .
आकाश : छे ते काय आपल्याला जमनार नाही .मी का सॉरी बोलु. ती काय मोठी महाराणी आहे का?तु चल मी डायरेक्ट विचारतो.

हर्ष : असा काही गड़बड़ करू नकोस .नाहीतर पहिल्याच भेटीत वाट लावशील .आपण पहिल्यांदा तिला भेटायला जातोय आणि तु पहिलीच भेटीत वाट लावतोस तु आपला भाव आहेस ना रे. तुझ्या सॉरी बोलण्याने तुझ्या मित्राचं भलं होणार असेल तर चांगलच आहे ना यार.

आकाश : चल तुझ्यासाठी काय तिला उचलून सुद्धा आणु .सम्या : एक काम कर आव्या तु तिच्या जवळून जा त्या दोघी काय बोलतायत ते जरा ऐकण्याचा प्रयत्न कर म्हणजे तिचा मूड कसा आहे याचा अंदाज येईल .आवि : बर जाऊन येतो (ती धनश्री सोबत गप्पा मारत असते) 

ती : धनु ही नविन पोरं खूपच आगाऊ आहेत मला तर यांचा फार राग आलाय .त्यांच्याकडे बोलायची सुद्धा इच्छा होत नाही . अजिबात आवडत नाहीत असल्या पोरांशी .मला कागदाचा गोला ज्यानी मारला ना त्याचा तर दोन कानाखाली वाजवायची इच्छा झाले .

धनश्री : तु नको जास्त टेंशन घेऊ (आवि २-३ वेळा राऊंड मरून पुन्हा त्याच्या मित्रांजवळ येतो).

अवि : यार अवघड आहे ती तर खूप चिडले . आणि तिला पोरांचा फार राग आहे .बोलायचं सोड ती म्हणते मला तर पोरांकडे बगायची सुद्धा इच्छा नाही .

सम्या : हर्ष आता तूच पुढे जा आणि तिला सांग २मि बोलायचं आहे हर्ष :यार मी कधी कोणत्या मुलीसोबत नाही बोलो महिते आहे ना तुला .हार्ट अधिच धडाधड करायला लागले जाम भीती  वाटते रे ! 

आकाश -तुला काय तिला प्रपोज़ करायचा आहे का ? भीती वाटायला का मी जाऊन सांगू हर्ष : ओके ओके चल जातो मी (हर्ष आतून खुप घाबरलेला होता पनं तरीपण  "कुछ पाने के लिए कुछ करना तो पड़ेगा ना " या विचाराने तो गेला तिच्याजवळ ती तिच्या मैत्रीणि जवळ गप्पा मारण्यात व्यस्त होती. हर्ष पुढे आणि तिघेजण मांगे होते )

हर्ष: (घबरतच पनं थोडा धीर धरुन बोलायचा प्रयत्न करत होता ) ऐक ना थोडं बोलायचं होते .

शिवन्या : कोण तु (थोड़ा भाव खात त्याच्याकडे न बगताच बोलत होती .जणू कही स्वताला ऐश्वर्या समजत होती ) मी तुला ओळखत नाही.

हर्ष :मी हर्षवर्धन . 

शिवन्या : मग काय काम आहे 

हर्ष : ते सकाळी तु वर्गात अलीस तेव्हा तुझ्या अंगावर गोला पडला होता .तो या दोघांनी चुकून मारला  होता.म्हणून ते तुला सॉरी बोलायला आलेत.

शिवन्या : अच्छा असं आहे का, मला वाटलं दुसरं काम आहे.किती घाबरले होते मी .

हर्ष : दुसरं काम म्हणजे ?

शिवन्या : नाही काही नाही (आणि तिने हर्ष कडे पहिलं व त्याला छान स्माइल दिलं . त्यानंतर आकाश आणि आवि ने सॉरी शिवन्या म्हंटलं व ते पुन्हा वर्गात आले .आता मात्र शिवन्या चा राग शांत झाला होता तिला वाटलं सुद्धा नव्हतं असं काही होईल.पनं कदाचित हर्षला पाहून ती आतुन थोडी सुखावली होती . इतका प्रामाणिक आणि सरळ मुलगा तिने सुद्धा पहिल्यांदा पहिला होता .to be continued .........

पुढचा भाग लवकरच पब्लिश होईल ,त्या आधी तुमच्या सर्वांचे आभार रोज चुकता तुम्ही प्रत्येक ब्लॉग वाचुन आम्हाला प्रेरणा देता 

तसेच ब्लॉग वाचल्यानंतर खाली "enter your comments box " मध्ये तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खुप महत्वाची असते तुम्हाला ब्लॉग कसा वाटला किंवा तुमच्या काहि गोड आठवणी ज्या या ब्लॉग वाचल्यावर आठवल्या त्या नक्की शेयर करा किवा काहीही suggestion असलं तरी लिहा जेणेकरून तुमच्या सुद्धा भावना आमच्या पर्यन्त पोहचतील . धन्यवाद ,असच प्रेम असूद्या 
तुमचाच सुदेश सूर्यकांत जाधव .


Comments

Popular posts from this blog

स्कूलवाली -माझ पहिलं प्रेम (भाग 01)

ती - माझं पहिलं प्रेम (भाग 10)