ती - माझं पहिलं प्रेम ( भाग 12)

   शाळेचा दुसरा दिवस 

आज शाळेचा दुसरा होता,नेहमी प्रमाणे हर्ष शाळेत जायची तयारी करत होता तोच आई त्याचा टिफिन घेऊन येते )

हर्ष ची आई : हर्ष आज खुप छान दिसतोयस, "अगदी हीरो बग" काल कोणी आवडली की काय?( म्हणत ती हर्ष च्या गालाखाली डोळ्यातिल काजळाचा टिका लावते).

हर्ष : काहीतरीच काय आई . मी काय लहान आहे का आता काजल लावतेस ती . आणि आता मी  हीरो वैगरे नाही दिसत. तुला आठवते मी जेव्हा लहान होतो तेव्हा तु मला पकडून आणायची अंघोळ घालुन काजल पावडर लावुन माझ्या हनुवटिला पकडुन बाजुने भांग पाडायची तेव्हा झाल्याची हीरो असल्याची फीलिंग येयाची आता कुठे आई : बाळ तु कितीही मोठा झालास तरी तु  माझ्यासाठी हीरोच राहणार (आणि हर्ष ला घट्ट मिठी मारते )

हर्ष : चल मी निघते (आईच्या पाया पडतो आणि हर्ष मित्रांना आवाज देत निघतो ) सगळेजण त्यांच्या सायकल वरुन महाविद्यालयाजवळ पोहचले  रोजच्या सरखीच गर्दी, आणि त्या गर्दीतून सायकल पार्किंगला नेत असताना परश्या च्या (प्रशांत पाटील - "८वी ब" चा वर्गप्रतिनिधी आभ्यासात हुशार मात्र भांडण करणं जणूत्याचा त्याचा  छंदच होता) पायला आवि च्या समोरचा टायर लागला .तोच परश्या ओरडला कोण आहे रे मा.####त . 

अवि : सॉरी भाई चुकून लागला गर्दी खुप आहे मग घाइ-घाईत तुला स्पर्श झाला .

परश्या : मग जरा डोळे उघडे ठेऊन चालवं तुझी फालतू सायकल मा####त,माझी नविन पैंट खराब झाली ना ....

आकाश : ये भो#####च्या.तो सॉरी बोलला ना मग शिव्या का देतो रे भा####व

परश्या : तु कोन PA की वकील आमच्या एरियात जास्त नाटकं करायची नाहीत समजल ना भो ##### च्या

आकाश :(आता मात्र खुप तापला होता, परश्या ची कॉलर पकडून एक जोरदार त्याच्या कानाखाली वाजवतो ). हे बग एरिया जरी तुझा आसला तरी हवा आपलीच आहे समजलं ना, तुझा माज तुझ्याकडे ठेव . नाहीतर जाल आणि धुर एकसंग कडील चल निघ ....

परश्या : आता उशीर झालाय तुम्ही  संध्याकाळी भेटा तुम्हला दाखवतो माज काय असतो ते

आकाश : अरे निघ नाहीतर पुन्हा एक वजविल चल.

परश्या : तू भेट संध्याकाळी

हर्ष : आरे कश्याला उगाच भानगडी करताय आपला हा फक्त दुसराच दिवस आहे आणि तुम्ही सुरु झालात.

आकाश : तु का घाबरतोस, तो पाटील असला तर आपण सरपंच आहोत.बघु काय करतो तो.(शाळेची घंटा वाजली आणि सर्वजण मैदनात आले.राष्ट्रगीत झाल्यावर पुन्हा पीटीच्या मास्टरानी काही नविन नियम सांगितले व सर्वजण प्रत्येकाच्या वर्गात निघून गेले. हर्षच्या वर्गात गोंगट चालु होता.त्यात काल कलेच्या शिक्षकांनी होमवर्क दिला होता त्यामुळे प्रत्येकजण एकमेकांची ओळख करण्यात व्यस्त होता.हर्ष आपली नोटबुक मध्ये काहीतरी लिहित होता आणि समीर कागदाचे गोले करुन आकाश व आवि ला मारत होता, ते दोघे सुद्धा मागुन सम्या ला मरत होते.तोच एक गोला आकाश ने जोरात आणि तो गेला थेट दरवाज्याच्या दिशेने, ती वर्गात पाय टाकायला आणि गोला तिच्या अंगावर पडायला नशीब चांगल म्हणावं की खराब आनं ती जोरात ओरडली,कोण तो मुर्ख? आवाज एवढा कडक होता की पूर्ण वर्ग शांत झाला. हर्ष ने वर पाहिले तर ती (शिवन्या) होती. आणि तिला पाहतच राहिला कारण एवढी सुंदर मुलगी त्याने आजवर पहिली नव्हती.पांढऱ्या रंगाची कुर्ती,पांढऱ्याच रंगाची लेंग्गीज.त्यावर लाल रंगाची ओढ़नी, वाऱ्यावर उडणारे लांब केस.रागाने लाल झालेला चेहरा त्यामुळे  टोमेटो सारखे झालेले गाल, तिची घायाल करणारी नजर . आज ती खुप छान होती. जणू काही अप्सराच जी थेट स्वर्गातून अवतरली आसावी. ती - म्हणजे शिवन्या पाटील.जराशी वेडी होती. थोड़ी अगाऊ, मनमोकळंपणे हसणारी .कधी अल्लड तर कधी अबोल.एका नजरेत भुरळ पडणारी .जगाची पर्वा न करता खळखळुन हसणारी. खुप जिद्दी हट्टी पनं तरीपण सर्वांची काळजी घेणारी . मधल्या सुट्टीत तर बेंच वर उभी राहुन एकटीच नाचायाची .



To be continued...........










SUDESH S JADHAV
7448170817
sidraje93@gmail.com

























































Comments

Popular posts from this blog

स्कूलवाली -माझ पहिलं प्रेम (भाग 01)

ती - माझं पहिलं प्रेम (भाग 10)