ती -माझं पहिलं प्रेम (भाग 11)
ती -माझं पहिलं प्रेम
दुपारचे ३वा गेले होते, कला विषयाचे शिक्षक वर्गात आले " शाळेतील सर्वात सुंदर व्यक्ति" त्यांच्या चित्रासारखे सुंदर नुसते दिसायला नाही तर मनाने सुद्धा, म्हणतात ना कलाकार हा नेहमी सुंदरच असतो आणि म्हणूनच चेहऱ्यावर नेहमी 'स्मितहस्य' अतिशय शांत प्रेमळ, सर्वांशी अगदी मनमोकळपणे बोलणारी सर्वाना अावडणारी व्यक्ती, वर्गात आल्यावर मुलांना नेहमी चला हवा येऊद्या मधील डॉ नीलेश साबले यांच्या सारखा एकच प्रश्नं विचारणार कसे आहत सगळे मजेत ना,आणि मजेतच असलं पाहिजे.आयुष्यभर आपल्याला शिकायचचं आहे पनं शिकत असताना नेहमी तणावपूर्ण शिकता आले पहिजे आणि त्यासाठी नेहमी आनंदी असणे गरजेचं आहे. कसलाही तणाव असेल तर माझ्याशी चर्चा करा,मी मार्ग सुचवेल. तासभर वर्गात सर्वांशी छान गप्पा मारल्या सर्वांशी ओळख करुण घेतली. अगदी कुठे राहता कसे येता घरी कोण कोण असतं वैगरे . सर्वांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे दुपारची वेळ त्यात 2 महीने सुट्टी खाऊन अलशी झालेली पोरं २वा झोपेत आलेली,पनं कलेच्या शिक्षकांमुळे त्यांची झोप कुठे गायब झाली त्यांना सुद्धा समजलं नाही .सर्वजण आगदी मनलाउन एकटक ऐकत होते.
त्यात त्या दिवशी एक अनोखा उपक्रम त्यांनी केला, सरांनी सर्वाना विचारले सर्व शिक्षकांनी तुमची ओळख विचारली का? सर्वजण एका सुरात ओरडले होओओओओओओ !!!!!
पुन्हा त्यांनी विचारलं , तुमची सर्वांची ओळख झाली? सगळे पून्हा एकत्र -हो म्हंटले .आणि मग सरांनी शेवटच्या बेंचवर बसलेल्या मुलाला विचारले उभा रहा आणि सांग पहिल्या रांगेतील तिसऱ्या बेंच वरच्या दोन्हीं मुलींची नावं सांग? आता मात्रा त्याची झोप उडाली त्याला काही सूचनाचं तो बिचारा मान खाली घालून तसाच उभा, मग सरांनी त्या दोघींमधील एकीला त्याचं नाव विचारले ? तिने मात्रा बरोबर नाव सांगितलं .

तेव्हा सरांनी त्याला सांगितले आपल्याला आपल्या वर्गातील प्रत्येकाची थोडी माहिती असावी त्याचं नाव काय तो कुठे राहतो कधीतरी वेळ आल्यावर आपल्याला त्याची गरज लागु शकते व यापुढे तुम्ही आयुष्यभर वर्गमित्र राहणार आहत त्यामुळे आपल्या वर्गमित्राची माहिती अासावी.
उद्या साठी तुम्हाला हाच होमवर्क असेल तुम्हाला मी उद्या सर्वाना एकमेकांची नावं पुन्हा विचारील तेव्हा सर्वानी एकमेकांची नावं पाठ करुन या.
तेवढ्यात वन्दे मातरम साठी घंटा वाजली व सर्वजण जागेवरच उभे राहिले आणि वन्दे मातरम सुरू झालं . (रोज शाळेतून सुटायाच्या अगोदर ५मी वन्दे मातरम होयचं आणि मग शाळा सुटण्याची घंटा होयाची) वंदे मातरम संपलं ४वाजले आनं दूसरी घंटा वाजली शाळा सुटण्याची, ज्याची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत होते घंटा वाजतच सर्वजण बैग मागे टाकून तयार.प्रत्येकाला घरी जाण्याची जणू काही घाई लागली होती .हर्ष आणि त्याचे मित्र सुद्धा निघाले . पुन्हा तिच गर्दी प्रत्येकाचा त्या गर्दीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न चालू होता. काही महाविद्यालयच्या आसपासचे तर काही खूपच लांब वाहतुकीची जास्त साधने उपलब्ध नसल्यामुळे डोंगरात राहणारी बिचारी गरीब मूलं तासंतास तास पाई चालत येत आणि चालत जात असे .आजची परीस्थिती खुप चांगली आहे आज प्रत्येक विद्यार्थी बस,प्राइवेट गाडी ने जातो .परंतु त्याच परिस्थितित अनेकांनी आपलं भविष्य निर्माण केलं. आयुष्यात यशस्वी झाले. याचा फार अभिमान वाटतो.
पुढच्या भागात आपण ज्या व्यक्तीची आतुरतेने वाट पाहत आहात ती येणार आहे , आणि ती आली म्हणजे कथेतील खलनायाक आले त्यांच्याशिवाय गोष्ट कशी पूर्ण होणार तर भेटूया पुढच्या रोमांचक भागात ..to be continued
www.lovediery.com
| SUDESH S JADHAV |

Comments
Post a Comment