ती - माझं पहिलं प्रेम (भाग 09)
ती - माझं पहिलं प्रेम
( मग बाईंनी तिला पुढे बोलावलं व सर्वांनी ''स्नेहलचं '' स्वागत केलं.तिला शुभेच्छा दिल्या, ''स्नेहल वर्गातील सर्वात जास्त मार्क्स पडलेली मुलगी होती , दिसायला थोड़ी सावली होती पण छान होती . चेहऱ्यावर नेहमी हसू,स्वभावाने गोड , सर्वांशी प्रेमाने बोलणारी, हि आगावं पोरं तिचं ऐकतील मात्रा यांत मात्र जरा शंकाच होती. स्नेहल ने सर्वांचे आभार मानले, तेवढ्यात खुप दिवस आकाशात जमा झालेले ढग पाऊसाच्या धारेत जोरदार आवाज करत पडायला सुरवात झाली आनं नकळत एका कवीचे बोल आठवले )
पाऊस कोसळतो छपरावरती त्यावरुन सांडती हजारो मोती काही माझ्या गाली पडती
काही करती गंधित माती पाऊस कसा हा अल्लड खेळातो कधी पानांतून तर कधी मनातून झरतो मनातील गाणे पाऊस जाणतो अबोल शब्दांना तो सुर लावतो मन माझे एकाकी पाऊस त्याला वेड लावतो नाही कुणी येणारे जरी उगा मिलनाची ओढ लावतो थोडा खुलवतो थोडा झुलवतो आकांक्षांना तो पंख लावतो ओंजळीत साठलेल्या तळ्याकाठी स्वप्नांचे तो गाव बांधतो पाऊस येतो पाऊस जातो मनाचे रितेपण तसेच राहते आंतरिच्या अश्रुंमधुन पावसाचेच गाणे उमटते..
वर्गशिक्षिक :ओळख झाली, वर्गप्रतिनिधिहि निवडला.आता तुमचे रोजचे तास लिहून घ्या,काढा तुमची नोटबुक .
पहिला तास - मराठी
दूसरा तास - इंग्लिस
तिसरा तास - science
चौथा तास - सामाजिक शास्त्र
पाचवा तास - हिंदी
सहावा तास -गणित
सातवा तास - कला
आठवा तास -पीटी
जवळ - जवळ दोन तासांनी पहिली घंटा वाजली आणि मधली सुट्टी झाली ..
To be continued ......

Comments
Post a Comment