ती - माझं पहिलं प्रेम (भाग 07)

 ती -माझं पहिलं प्रेम ....

(महाविद्यालयाच्या प्रांगणात सगळेजण एका रांगेत आप -आपल्या -वर्गानुसार आणि ऊंची नुसार उभे होते,सर्व शिक्षक,कर्मचारी आणि प्राचार्य समोर च्या स्टेज वर होते,बाजुला एक विद्याथिनी आर्डर देण्यासाठी उभा होता,पूर्ण मैदान विद्यार्थ्यांनी भरलं होते,साधारण 800-900 विद्यार्थी असतील, एकच यूनिफार्म असल्या मुले पूर्ण परिसर एकाच रंगाचा झाला होता,आणि खुप आकर्षक वाटत होता, मुलांची चुलबुल चालू होती पीटी मास्तरांनी एकच आवाज टाकला आणि वातावरण एकदम सुन्न झालं.मग त्या मुलीने आर्डर केली,एक साथ सावधान,एक साथ विश्राम, एक साथ सावधान,एक साथ राष्ट्रगीत सुरु कर .....आणि राष्ट्रगीत सुरु झाले .

जन-गण-मन अधिनायक जय हेभारत भाग्य-विधाता,पंजाब-सिन्धु-गुजरात-मरठा-द्राविधू-उत्कल-बन्गविन्ध्य-हिमाचल-यमुना-गन्गाउच्छल-जलधि-तरंगतव शुभ नामे जागेतव शुभ आशीष मांगे,गाहे तव जय-गाथाजन-गण-मन-मंगलदायक जय हेभारत-भाग्य-विधताजय हे, जय हे, जय हे,जय जय जय जय हे !!!!!!!!!!!!!!!!!


सकाळचे १०वा २०मी झाली होती, राष्ट्रगीत संपलं आणि पुन्हा ती विद्यार्थीनी ओरडला एक साथ विश्राम, आणि सर्वानी एकच श्वास सोडला, पण खर तर सुरवात आता खरी होणार होती, प्राचार्य थोडे पुढे आले, त्याने आपल्या महाविद्यालयाचा इतिहास सांगितला,त्याची ओळख सांगितली, महाविद्यालयाची परंपरा सांगितली (प्राचार्य दिसायला तसा खुप शिस्तबद्ध,हुशार आणि सर्वाना प्रेमानी माहिती सांगत काही अडचणी आल्या तर सरळ माझ्या ऑफिस मधे तुम्ही कधीही बिंदास या,तसेच गैरवर्तन करणाऱ्या विद्यार्थ्याला माफ़ी मिळणार नाही असा त्यांनी  बजाउन  सांगितलं ) सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी स्वागत केले, त्यांना त्यांच्या शैक्षणिक वर्षांसाठी शुभेच्छा दिल्या व त्यानंतर त्यांनी पिटी च्या मास्टराला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि महाविद्यालयाचे नियम सांगण्यास सांगितले . पीटी मास्तर पुढे आले( हा मास्तर दिसायलाचं खुप आक्रमक,शिस्तबद्ध, आणि खड़ूस होता, सर्वात जास्त विद्यार्थी यांचा मार खात असे.)पीटी मास्तर : शुभ प्रभात !!! मी तुमचा पिटी मास्तर,माझी नजर प्रत्येक विद्यार्थ्यांवर असते त्यामुळे कोणी जर नियम तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याची गय केली जाणार नाही,त्याला कठोर शिक्षा केली जाईल, मी जे नियम सांगतोय ते नीट लक्ष्य देऊन ऐका नाहीतर पुन्हा समजलं नाही तर काही बोलु नका मी एकदाच सांगतो. आणि मला नियम तोडणारी मूलं अजिबात आवडत नाहीत .तर, नियम क्र 01 : रोज शाळेत वेळेत येयाचं.नियम क्र 02 :शाळेचा यूनिफार्म रोज नीट व्यवस्तित घातलेला असावा, जर नसेल तर घरी हाकलून देण्यात येईल, बुधवारी फक्त यूनिफार्म ला सुट्टी असेल आणि जर वाढदिवस असेल तर . नियम  क्र 03 : मुलांचे केस नीट कापलेले असावे,जर का जास्त वाढलेले दिसले तर हिथेच कापले जातील. आणि मुलींचे व्यवस्तित वेणी घातलेले असावे. नियम क्र 04 : मधल्या सुट्टीत किंवा वर्गाच्या बाहेर, किंवा मैदानात फिरत असताना डाव्या बाजूने  चालावे तेसुद्धा दोन्ही  हाथ मागे ठेऊन,जर  का हाथ मागे नसेल असा मला कोणी सापडला तर त्याला एक तास पायाचे आंगटे धरुन ठेवावे लागतील .नियम क्र 05 : जर एखाद्या विद्यार्थ्यानीं कोणत्या मूली सोबत गैरवर्तन केलं तर त्याला सरळ शाळेतून हाकलून दिलं जाईल .असे अजुन बरेच नियम लागु होते . शेवटी त्यांचं भाषण संपलं आणि त्यानी सर्वाना आप-आपल्या वर्गात जायाला सांगितले.  To be continued .........
SUDESH S JADHAV
Writer




Comments

Popular posts from this blog

स्कूलवाली -माझ पहिलं प्रेम (भाग 01)

ती - माझं पहिलं प्रेम (भाग 10)