" ती माझं पहिलं प्रेम "
(सगळेजण महाविद्यालयाच्या मुख्य गेटवर पोहचले,आज दिवस होता 13 जून 2005. सेवाभावी संस्थेचं महाविद्यालय जरी असलं तरी, एखाद्या नामांकित महाविद्यालया सारखं , भव्य दिव्य अश्या दिमाखात चमकत होतं , महाविद्यालयाच्या समोर भलं मोठं मैदान होतं चारही बजूने ऊंच ऊंच झाड़े, थंडगार हवा देत होती.अासपासचं वातावरण खुप मनाला प्रसन्न करणारं आणि निसर्ग रम्य होतं, इमारत जरी थोड़ी जुनी असली तरी छान दिसत होती . सयाद्री च्या कुशीत वसलेली ती एक अप्रतिम शाळा होती,जिने आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना घडवले .पोचेपर्यंत ९:३०वा होते उशीर झाला होता आजूबाजूला प्रचंड गर्दी, प्रत्येकजण त्यांचा वर्ग शोधत होता,हर्ष आणि त्याचे मित्र त्या गर्दीतून वाट काढत सायकल पार्किंग मध्ये पोचले,सर्वानी आपल्या सायकल पार्क केल्या आणि पुन्हा त्या गर्दीतून वाट काढत त्यांचा वर्ग शोधायला लागले.मुख्य गेट मधून प्रवेश केला की डावीकडे थोड्या वर काही पायऱ्या चढून गेलं की प्राचार्याचं ऑफिस त्यानंतर लगेचचं त्याच्या बाजूला कर्मचाऱ्याचं ऑफिस, त्याच्या बाजूला १०वी चा वर्ग आणि पुढे सरळ प्रत्येक वर्गाचे क्लासरूम बाजु -बाजु ला होते, जसे की, ९वी अ,९वी ब ,८वी अ, ८वी ब असे.शेवटी त्यांना त्यांचा वर्ग सापडला "८वी अ " उशिर झाल्यामुळे वर्ग अगदी पूर्ण भरला होता,फक्त दोन-तीन बेंचेस शिल्लक होत्या एक पहिली आणि बाकीच्या दोन शेवटच्या होत्या, वर्गात खुप गर्दी मुलांचा अरड़ा ओरडा ,बडबड चालू होती ,हर्ष आणि सम्या पहिल्या बेंच वर बसले आणि अवि व अकाश शेवटच्या बेंच वर बसले,कारण हर्ष आणि समीर हुशार होते त्यामुळे मागे बसण्याचा प्रश्न येत नव्हता आणि अवि व अकाश याना मागे बसन्याशिवाय पर्याय नव्हता कारण दोघेही अभ्यासात सारखेच.वर्गात साधारण ६०-६५जन होती पहिल्यांदा एवढ्या गर्दीत हर्ष आणि त्याचे मित्र बसले होते,)

सम्या : तुला अधिच मी बोलो होतो लवकर चल ,तर ऐकलं नाहीस "अवि आपली जान आहे जान "त्या दोघांना काय नालायक आहेत ते आपल्याला आता फुकटचा मार खावा लागेल ,मरा आता च्या अाईला.हर्ष :सम्या तु कश्याला एवढा घबरतोयस आपण काय एवढे अडानी आहोत का ? जे होईल ते होईल बघुया ना यार .सम्या :काय घंटा बघु ,तुला नाही माहिती हिथे पहिल्या बेंच वर मास्तर सारखा प्रश्न विचारतो आणि नाही अाला की ठोकतो मस्त .हर्ष :मैं हु ना यार ! (मागे अवि आणि अकाश दोघांची कुजबुच चालू होती ) अकाश :यार अवि बग जरा नजर टाक तिकडे कोणी दिसताय काय बघं , कोणी आवडती काय ?अवि :अरे आक्या किती वेळ झाला रे वर्गात येऊन जरा शांत बस,तो सम्या पहिल्या बेंच वर बसलाय माझ्या नवाने शिव्या नक्कीच घालत असेल ,आणि तुला नहिते सुचतयं .अकाश :त्याला सोड ती बग पहिल्या रांगेतील दुसऱ्या बेंच वरची कसली भारी आहे !!(तेवढ्यात बेल वाजली राष्ट्रगीताची वेळ झाली सर्वाना शाळेच्या मैदानामधे बोलावण्यात आले )lovediery.blogspot.com
Comments
Post a Comment