ती -माझं पहिलं प्रेम (भाग 05)

                                                ती -माझं पहिलं प्रेम


(हर्षवर्धन च्या वर्गात सतावीत 18 विद्यार्थी होते,सगळेच पास झाले होते परतुं घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे  पुढे ८वी फक्त 12 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला होता हर्षववर्धन त्या वर्षी वर्गात दूसरा आला होता,मात्र शिष्यवृत्ति परीक्षेत वर्गात एकटाच पास झाला होता, आणि म्हणून त्याच्या वडिलांचा त्याच्यावर खुप जीव असायचा, गावापासून नविन विद्यालय ४km वरती होते, हर्षने आपल्या सर्व वर्गमित्रांना  जमा केले व साईकल वर सगळेजण निघाले,अजुन 'अविनाश आला नव्हता,त्यांच घर शाळेत जाताना वाटेवरच होतं ' मग सगळेजण अविनाश च्या घराजवळ थांबले होते .
हर्ष : ये अविनाश चल लवकर उशीर झालाय !!!!!!!

अवि : आलो मिनीटात ...(अवि घरातूनच ओरडत )

सम्या (समीर ): आयला हरश्या लवकर चल त्याला राहुदे शाळेचा  पहिला दिवस आहे, खुप गर्दी असेल आपल्याला आपला वर्ग शोधवा लागेल, नंतर आपल्या आवडीची बेंच जर का उशीर झाला ना तर वर्षभर पहिल्या बेंच वर बसून मास्तराचा मार खात काढावा लागेल.

हर्ष : हो रे ..........पण अवि आपली जान आहे तो आल्याशिवाय नाही, मग पहिल्या बेंच वर बसावं लागलं तरी चालेल !                                                      

(अव्या म्हणजे अविनाश हर्षवर्धनचा लहानपनापासूनचा मित्र अगदी भावासारखा म्हणजे जन्माला अल्यापासूनचा, अवि १५दिवसानी मोठा होता,पण दोघेही एकत्र उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असायचे, अवीचं घर आणि हर्षचं घर जवळजवळ होते दोघे एकमेकांचे  शेजारी, पण वर्षभरापूर्वी अवि ने नविन घर मुख्य रस्त्यांवर बांधले होते अणि तो हर्ष पासून दूर गेला पण तरीही मैत्री एकदम  घट्ट होती, जसे की लंगोटि यार )




   

 आकाश :ये सम्या मला आपल्या गावातील ९वी ची पोरं सांगत होती शाळेत खुप नविन नविन पोरी येतात लवकर गेलास तर ४पोरींशी ओळख होते,मग त्यामधील  एकजण चांगली निवडून तिला प्रोपोज़ करता येतो, जशी तुम्हाला तुमच्या आवडीची बेंच पाहिजे तशी मलापण माझ्या आवडीची आइटम पाहिजे " जिवाला जिव लावणारी  चला लवकर मला तर या गावातल्या पोरी  बघून जाम कंटाळा अालाय,कधी एकदा नविन पावटा - गोमटा (कोड भाषेत मूलीना न समजावी आकाश ने तयार केलेली नावे,याचा फायदा जर का एखादी मुलगी समोरून अली आणि आकाश ला तिची स्तुति करायची असेल तर तो  बिंदास्त तिच्या समोर तिला बोलू शकतो कसला भारी पावटा आहे राव?पण त्या मुलींना काही ही समजत नसायचं,जर तो एखाद्या मुलीला सरळ कि बोला काय भारी आइटम   आहे म्हणजे त्याचं काम भारी झालं समजा )बघतोय असं झालाय माझं बाग.

हर्ष : नालायका आता तरी सुधर ...बापाच्या जीवावर पास केलाय मास्टरानी तुला, फालतुगिरी हिथे जर का तु केलीस तर नक्की मार खाशील ?

अवि :ये चला रे मी अलोय .        

(अणि आता सर्वजण मार्गस्त झाले )     

to be continued ..................  Next part tomorrow morning 6am

Comments

Popular posts from this blog

स्कूलवाली -माझ पहिलं प्रेम (भाग 01)

ती - माझं पहिलं प्रेम (भाग 10)