ती - माझं पहिलं प्रेम (भाग 13)

शाळेचा दुसरा दिवस  

कोणी काहीच बोलायला तयार नाही, तशीच वैतागुन ती मुलींच्या पहिल्या रांगेत पहिल्याच बेंच वर बसली. खोडकर होती पण अभ्यासात हुशार होती .
सम्या : नशीब वाचलो नाहीतर काय खैर नव्हती आपली.बाप मास्तर आहे तिचा.पन एक गोष्ट कळत नाही आम्ही नविन यूनिफार्म घालून आलोय आणि ती अप्ससरा बनुन आले, तिच्या बापाचा बर्थडे आहे की तिचा .
हर्षा :पण कसली क्यूट आहे ती, " आज ती खुप सुंदर दिसते" पनं तिला कसं सांगणार, आपली ओळख ना मैत्री. तिचं नाव तरी माहिते काय तुला?
 सम्या :नाही रे मागाशी बाहेर एका मास्तराजवळ बोलताना पहिलं तेव्हा समजलं तिचा बाप मास्तर आहे.
हर्ष : आपली ओळख करुण देशील काय ?
सम्या:अवघड आहे पन प्रयत्न नक्की करू. मागे दोन बकरी आहेत ती त्या वाघिणी समोर ठेवली की आपलं काम झालं म्हणून समज.
हर्ष :म्हणजे नक्की काय करायचं ?
सम्या: हे बग काही क्षणापूर्वी ती का तापली होती?
हर्ष : आकाश ने गोला मारला तिला म्हणून.
सम्या : मग आता तु त्या दोघांना घेऊन जा मधल्या सुट्टीत आणि सांग तिला चुकून या दोघांनी मारला  ते सॉरी बोलायला आलेत . मग बग तुझ्यावर खुश होते का जर झाली तर ठीक नाहीतर मग विषय बंद.
हर्ष :बर नक्की आता फक्त त्या दोघांना पटवायला पाहिजे . ते तयार झाले म्हणजे निम्मी लडाई हीथेच जिंकलो समजायचं .
(वर्गशिक्षिका वर्गात आल्या सर्वजण उभं राहीले आणि गुड मॉर्निंग म्हणत बाईंचं स्वागत केलं,नंतर त्यांनी बसायला सांगितले.
वर्गशिक्षिका : आज कोण कोण नविन आले आहे त्यांनी उभं रहा .
(4-5 नविन पोरांची भर्ती झाली होती त्यात ती एक,सर्वजण उभे राहिले )
वर्गशिक्षिका : आता एका -एकाने आपली पूर्ण ओळख सांगा ?
पहिला मुलगा : माझं नाव सूरज पवार.मी मा××रीला राहतो.मला सातवित 60% होते.
दूसरा मुलगा :मी यश साळुंखे,राहणार प×××वी.मला सातवित 40% होते 
पहिली मुलगी : मी धनश्री  वाडकर राहणार अमरावती .पण राहायला हिथेच शाळेच्या मागे मावशीकडे.मला सातवित 70% होते .
ती : मी शिवन्या प्रकाश पाटील .मी सुद्धा राहायला हिथेच आपल्या शाळेजवळ. मला सातवित ८०%होते .
हर्ष : सम्या ही तर पटिल आहे.आणि राहायला सुद्धा हिथेच आपलं काही खरं नाही जर हिला प्रोपोज़ केला तर, अधिच एक पाटील आपली वाट बघतोय आपल्याला ठोकायला आणि त्यात ही पण पाटीलच .
सम्या :यार तु नको टेंशन घेऊ आकाश आहे ना मग शांत बस 
वर्गशिक्षिका :शांत बसा सर्वानी आता.





To be continued .......
पुढचा भाग लवकरच पब्लिश होईल ,त्या आधी तुमच्या सर्वांचे आभार रोज चुकता तुम्ही प्रत्येक ब्लॉग वाचुन 
आम्हांला नवीन ऊर्जा देता लिहिण्यासाठी . ती - माझं पहिलं प्रेम ही  ब्लॉग सीरीज 10-15 भागाची नसून 100 +भागाची आहे त्यामुळे कधी कधी पार्ट late पब्लिश होतो त्याबद्दल क्षमस्व .तसेच ब्लॉग वाचल्यानंतर खाली "enter your comments box " मध्ये तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खुप महत्वाची असते तुम्हाला ब्लॉग कसा वाटला किंवा तुमच्या काहि गोड आठवणी ज्या या ब्लॉग वाचल्यावर आठवल्या त्या नक्की शेयर करा किवा काहीही suggestion असलं तरी लिहा जेणेकरून तुमच्या सुद्धा भावना आमच्या पर्यन्त पोहचतील . 
धन्यवाद ,असच प्रेम असूद्या 
तुमचाच 
सुदेश सूर्यकांत जाधव 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्कूलवाली -माझ पहिलं प्रेम (भाग 01)

ती - माझं पहिलं प्रेम (भाग 10)