ती - माझं पहिलं प्रेम (भाग 04)

                                  ती - माझं पहिलं प्रेम (भाग 02)


हर्षवर्धन एक साधा सरळ मध्यमवर्गीय मुलगा, रायगड जिल्यातील महाड तालुक्यातील एका छोट्याश्या गावात जन्माला आलेला नुकताच सातवीं पास होऊन, जि प शाळेतून महाविद्यालयात जाणार होता (हाफ पैंट मधुन फुल पैंट आणि फरशी वरुण बेंच वर )त्यामुळे तो खूपच आनंदी होता. कधी एकदा नवीन शाळेत जातो असं झालं होतं त्यामुळे तो खुप उत्साही झाला होता, महीनाभर आधीच सर्व तयारी करुण स्कूल बैग भरून तयार होती. प्राथमिक शिक्षण सातवी पर्यन्त गावातच झाल्यामुळे घरापासून दूर जाण्याचा संबंध नव्हता.पण आता थोडे लांब जावे लागणार  म्हणून थोडी चिंता सुद्धा वाटत होती.बाहेरच्या जगापासून, गर्दी पासून दुनियादारी पासून खुप लांब होता.



हर्षवर्धन :आई झाला का टिफिन ? किती वेळ अजुन आज माझा शाळेचा पहिला दिवस आहे महित आहे ना !

आई - हो रे सोन्या .....तुझं झालं का ? बैग भरली,पाण्याची बॉटल.

हर्षवर्धन : हो हो झालं माझं सगळं, थोड़ी पाउडर लावतो

आई : थोडीच लाव नाहीतर पोरी मागे लगतील .

हर्षवर्धन :गप बस्स !!!!!!मी काय पोरी बघायला जातोय काय ?

आई : नाही रे बाबा मी चेस्टा केली, पण तरीपण कोणी कितीही काही बोलं तरी लक्ष देयाचा नाही.       

  "नवीन शाळा खुप मोठी आहे ऐकलं तिथे खुप जास्त मुले-मूली असती" पण तु तुझ्या अभ्यासात लक्ष दे , कोणत्या पोरी बीरी च्या भानगडित पडू नाकोस नाहीतर आयुष्याची वाट लावशील, पुन्हा बोलू नकोस आई बोल्ली नाही म्हणुन 

हर्षवर्धन : आई तुला माहित आहे ना, मला असल्या गोष्टी आवडत नाही "मला माझं करिअर महत्त्वाचं आहे".
आई : हो तरीपण सांगते, चल ये तुझा टिफीन तयार आहे .

हर्षवर्धन : दे आणि थांब (आई च्या पाया पडत ) आशीर्वाद दे आज पहिला दिवस आहे .

आई : बरं सावकाश जा सोन्या .

हर्षवर्धन:येतो आई चल बाय........

(आणि हर्षवर्धन आपल्या मोठ्या ताई ची साइकल घेऊन निघाला, हर्षवर्धन सातवित असतांना गावातील सर्वच मुलींना सरकार कडून शाळेत जाण्यासाठी साईकल मोफत भेटल्या होत्या, हर्षवर्धन ची मोठी ताई नापास झाल्यामुळे घरीच होती पुढे शिकायचं नाही हे तिने ठरवलं होतं व त्या दिवशी ती मामाकडे गेली होती आणि छोटा भाऊ आताच ५वि गेला होता त्यामूळे तो झोपला होता त्याला शाळेत जाण्यासाठी खुप वेळ होता.)  to be continued ...........next part tomorrow evening






Comments

Popular posts from this blog

स्कूलवाली -माझ पहिलं प्रेम (भाग 01)

ती - माझं पहिलं प्रेम (भाग 10)