ती -माझं पहिलं प्रेम (भाग 03)

शाळेचा पहिला दिवस !


किती मजा, किती धमाल!!
नवं दप्तर,नवी पुस्तके,,,,, 
 नव्या वह्या, नवा गणवेश,
 नवा बुट,नवा वर्ग,नवा मित्र
सारं कसं नवं नवं!!

धडे नवे, कविता नव्या, बाई पण नव्या!!
नवीन गाणी, नवीन चाली अभ्यास ही नवा!!
किती किती मजा....

पुस्तकांचा तो नवीन वास!
वही चे ते कोरे पान!!
हात फिरवता त्या पानावर
अनुभवस येते स्वर्ग सुख!!

शाळेचा तो वर्ग नवा वर्गाचा कोपरा ही नवा
मित्रांसोबतचा दंगा नवा
अन् शिक्षकांचा ओरडाही नवा!!

शाळेचा तो रस्ता नवा!
दोस्तां सोबत पंगा नवा!
अन् माझा ही तो रूबाब नवा!!
शाळेचा तो पहिला दिवस
किती मजा किती धमाल!!

जुन महिना सुरु झाला म्हणजे शाळा सुरू होणार आणि पाऊस सुद्धा येणार ,आणि जुन महीना सुरु झाला कि आकाशात जमणारे काळे ढग वातावरणातील गारवा ,अचानक पडणारा पाऊस  आधीच उन्हाने जिव कसबीस झाला होता अश्या जीवाला थंडगार करुन  नाक्यावरची गरमा गरम भजी आणि कडक चहा ची आठवण करुण देतो ,जुन पाऊस आणि शाळा हे त्रिवेरी समिकरण दरवर्षी ठरलेलं ,शाळा सुरु होणार म्हणजे सर्वात जास्त धावपळ होते ती पालकांची,साधारणत :१२ते १५रा जुन पर्यन्त शाळा सुरु होते पण १५दिवस आधीपासूनच मुलांच्या खरेदीला सुरुवात होते ,नविन शूज,नवीन बैग,नविन यूनिफार्म,नविन पुस्तक,आणि बरेच काही, दिवाली नसतानाही पालकांचं दिवालं  काढ़ते असं असलं तरी एक बाप आपल्या पाल्याला काहिही कमी पडु देत नहीजसा दरवर्षी पाऊस बदलत असतो,तसाच विद्यार्थी आपला वर्ग.ज्याप्रमाणे शेतकऱ्याला जुन सुरु होतचं पाऊसाची उत्सुकता लागते तशीच उत्सुकता लागते विद्यार्थ्यांना नविन शाळेची नविन मित्र मैत्रिणींची .

यात सर्वात गमतीदार गोष्ट म्हणजे शहरातील नामवंत शाळेत जाणारी मुले त्यांच्या खासगी गाडीतून आपल्या पालकांसोबत येतात, आणि सेवाभावी संस्था च्या माध्यमातून चलणाऱ्या शाळेतील माध्यम वर्गीय मुले बिचारी चलत, बस ने, साइकल वरुण येतात , ना कोणी पालक येत ना कोणी ......मात्र उत्साह चेहऱ्या वरचा आनदं दोघांचा आकाशात न मावण्यासारखा असतो . नामवंत शाळेत शिकणाऱ्या पालकाची अवस्था फार चिंतादायक असते कारण एवढे पैसे भरून पोरगं चांगलं शिकलं तर बरं ......हर्षवर्धन एका माध्यम वर्गात जन्माला आलेला त्यामुळे नामवंत शाळेत जाण्याचा प्रश्नच येत नाही ,

To be continued ...................loveseries.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

स्कूलवाली -माझ पहिलं प्रेम (भाग 01)

ती - माझं पहिलं प्रेम (भाग 10)